Tuesday, 16 May 2017

जीवन

A new addition to my poetry: 

जीवन तर एक कोड आहे, आपण फक्त जगत राहतो

दिवसाची रात्र अन रात्रीचा दिवस होतो
कधी मोठे होणार म्हणत बालपण सगळं सरून जात
मला परत लहान व्हायचं आहे म्हणत, आपण स्वप्नांसाठी जगत राहतो

पाळण्यात खेळणारी पावले,कधी घरभर नाचू लागतात
अन बोबडे बोल प्रश्नांची बरसात करून हैरान करतात
तेव्हा मुले केवढयात मोठी झाली म्हणत, आपण कौतुकाने जगत राहतो

रोजची धावपळ अन टेन्शन मुळे जीव नको नकोसा होतो
पण अचानक कधी आरशात पाहताना जेव्हा एक पांढरा केस दिसतो
तेव्हा अजून माझं वयच काय, म्हणत आपण चिर तरुणासारखं जगत राहतो

किती उन्हाळे पावसाळे पहिले, तरी जीवनाच कोड काही उलगत नाही
किती प्रश्न अनुत्तरी राहीले तरी, जीवन काही थांबत नाही
जे हवं ते नाही मिळालं तरी तडजोड करत आपण कसंतरी जगत राहतो

एकट्यानेच यायचे अन एकटेच जायचे, तरी मोहाच्या पाशात गुंतत राहतो
कशाला जगायचं म्हणणारा जीव मृत्यूची खंत करू लागतो
मरणाची खात्री असते, तरी आपण माञ सगळं माझं माझं म्हणत जगत राहतो

जीवन तर एक कोड आहे, आपण फक्त जगत राहतो