This is one of the my favorite poems from my writings, for which I won the 1st prize in a state level poem competition.
लहान होते अजान
होते, तेव्हाच सतीच
वाण माज़्यावर लादल
काय सांगू कस सांगू
नियतिन आपसुक जाळं टाकल...
खेळण्या-बागडण्याच वय होत,
अन संसाराशी बांधल
नात
देह बदलतो, वातावरण बदलत,
पण मन मात्र
तसच राहत...
रातीपाल्याद
दिस उजड गुरावणी
राबत
नवऱ्याच्या
लाथा खाउन नशिबाला
कोसत ...
कुणास ठाऊक काय
होत दैवाच्या मनात
म्हणूनच आल वैधव्य
जीवनाच्या अर्ध्यात...
पण खर आहे
लेका, आपल्या लेकरांची
चिंता त्याच्याच पोटी
म्हणूनच पाठवलं विधात्यान तुला,
मला आई म्हणण्यासाठी...
तूच आता जीवनाचा
'श्वास' होतास, तुझ्यासाठी जगण
अन तुझ्यासाठीच मरण, तूच
तर होतास माझा
आशेचा किरण...
हाडाची काड करून
उपाशी ऱ्हायला काइच
वाटत न्हवत
कायबी करून कसबी
करून, तुला आफिसार
करायचं सपान डोळ्यात
व्हत...
तू शिकण्यापाई गेलास खरा
परगावी,
पर तुज्या आठवणींचा आसू
आता रोजचाच पावणा
झालाई...
तू शिकलास, साता समिन्द्रापल्याड आज गेलास
मला तर स्वर्ग
मिळाला बाई
आता तुला डोळभरून
बगण्याशिवाय काइबि इच्छा न्हाई…
तू घरला मागारी येणार कळताच मन
सुपाएवढ फुललं
तिरडीवर जाण्याआधीच या म्हातारीला
जणू गंगास्नान घडल…
त्या दिशी रातभर
माझा डोळाच लागला
न्हाई
सारखी नुसती आवरायची घाई
न तुझ्या येण्याचीच
दिरंगाई …
आया-बायांची दार पुजून
तुझ्या आवडीची खीर बनवली
कवा यायचास र लेका
बग की र
सांज झाली …
तुझ्याच वाटकड लागलेत माझ
डोळ तान-भूक
हरवूनी
कवा तू यायचास
अन म्हणायचास मला
'आई'...
गाडीचा आवाज येताच
तुझ्या येण्याची चाहूल लागली
अंधारलेल्या
मनात माझ्या आशेची
ज्योत नवी जागली…
तू आलास, पण..पण..तू एकला
न्हवता आलास
तुझ्यासोबत
ती तुझी बायको..न्हव..माझी सून
घेऊन आलास…
क्षनभर सुन्न झाले पण
शेवटी तुझीच आई
त्या अनोळखी चेहऱ्यातदेखील आपलेपनाच
पाही…
'आंधळा मागतो एक अन
देव देतो दोन
डोळे'..असच काहीस
झाल
एका निमिषात या म्हातारीला
आभाळ ठेंगण झाल…
माझी गोरी-गोमटी,
इंग्रजी बोलत्याली सून नव्यान
घरात यायची म्हणून
बिगीबिगीण तांदळाच माप उंबऱ्यावर ठेवल आणून…
पण त्या येडीला
माझी माया कळलीच
न्हाई
या पडक्या घरात म्हणते
मी मुळीच ऱ्हायची
न्हाई…
बायकोच्या एका शब्दाला
तू पण लेका
भाळलास
आज तुझ्याच आईचा देह
तू जिवंतपणी जाळलास
…
इतक्या वर्षांनी घराची खबर
तरी घ्यायची होतीस
लहानपणी मिटक्या मारत खाणाऱ्या
खिरीची चव तरी
बघायची होतीस…
तू खाली मन
खालून निघून गेलास
पण एकदा माझ्या
नजरेत बघून बोलायचं
होतस
तुझी आईच आहे,
परकी नाही मी,
माझ काय चुकल
ते सांगायचं होतस…
तुझ्या जाण्याबरोबरच सार काही
गेल
इतक्या वर्षांनी पालवी फुटलेलं
हे झाड, आज
मुळापासून कोलमडल…
या घरादाराला तुझ्या आठवणीचीच
शिदोरी लाभलीय
तू कधीतरी येशीलच, आता
वाट पाहण्याची सवय
लागलीय…
माझ्या मरणाची बातमी ऐकून
तुझ्या डोळ्यात पाणी नक्कीच
येईल
अन तेही नाही
आल तर तू
मात्र नक्की ये…
फक्त एकदाच ये लेका,
तुझ्या आईला भेटायला
लहानपणी अंगाई म्हणून तुला
झोपवणाऱ्या आईला
मातीमध्ये कायामचच झोपवायला...!!!